देवाच्या प्रीतीत
अध्याय 3:16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.
निर्मिती
अध्याय 1:1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता 3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
येशू ख्रिस्ताचा जन्म
अध्याय 2:6 ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली. 7 आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यंामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. 8 आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. 9 आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले. 10 देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. 11 कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे. 12 आणि तुमच्यासाठी ही खूण असेल : फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.” 13 आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते; 14 “स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
अध्याय 23:1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. 2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. 3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
काहीही देवापासून आपल्याला वेगळे करू शकत नाही
अध्याय 8:38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
ईश्वराचे सर्वात महत्त्वाचे नियम
अध्याय 22:36 त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” 37 येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ 38 ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39 हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा. 40 सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
कोणीही देव आणि पैसा दोन्ही सर्व्ह करू शकता
अध्याय 6:24 “‘कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
आमचा देव एक देव आहे जो वाचवतो
स्तोत्रसंहिता 68:20 तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो. 21 देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल.जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
प्रेम
1 करिंथकरांस 13:1 मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. 2 जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माइया ठायी प्रीति नसली, 3 तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माइयात प्रीति नसली, 4 तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही.प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. 5 ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, 6 वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. 7 सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते
प्रभु तू मला ओळखतोस
स्तोत्रसंहिता 139:1 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. 2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात. 3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
आनंदित व्हा. प्रभू जवळ आला आहे
फिलिप्पैकरांस 4:4 प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. 5 मी पुन्हा म्हणेन: आनंद करा! तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी. प्रभु जवळ आहे. 6 कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. 7 जी शांति देवापासून येते, जी शांति सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंत:करण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील.
आमचे भवितव्य: एक नवीन आकाश आणि एक नवीन जग
प्रकटीकरण 21:1 मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीपाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती.आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. 2 पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर ʊयरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवादु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”
परमेश्वरावर विश्वास ठेवा
नीतिसूत्रे 3:5 परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. 6 तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.